Ad will apear here
Next
‘सोलापूर विद्यापीठाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक निधी दिला जाईल’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

सोलापूर : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्याच्या मागणीला राज्य शासन निश्चित परवानगी देईल आणि त्यासाठीचा निधीही उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचबरोबर विद्यापीठाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक आराखड्याला टप्प्याटप्याने आवश्यक निधीही दिला जाईल,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. प्रत्येक विद्यापीठांनी विस्तारीकरणाबरोबरच गुणवत्ता विकासाकडेही लक्ष देण्याची गरज त्यांनी या वेळी व्यक्त केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन इमारतीचा पायाभरणी समारंभ ११ जुलैला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी राज्याचे सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख, सार्वजनिक आरोग्य, परिवहन व राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘विद्यापीठाच्या भव्य व सुसज्ज इमारतीचे भूमिपूजन करताना आनंद होत आहे. कारण केवळ एका जिल्ह्यापुरते मर्यादित असले, तरी या विद्यापीठाने विद्यार्थ्यांना आवश्यक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव दिले आहे. त्यांचे कार्य देशभरात आणि विविध क्षेत्रांत होते. कुशल प्रशासक म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे विद्यापीठाने अध्यासन सुरू करावे, त्यास आवश्यक तो निधी निश्चितपणे देऊ.’

‘विद्यापीठाने विस्तारीकरणासाठी आखलेल्या आराखड्यास टप्प्याटप्प्याने निश्चितपणे अर्थसंकल्पातून निधी दिला जाईल. सध्या सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढत आहेत. हे क्षेत्र विस्तारत असताना त्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ विद्यापीठाने तयार केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी फाइव्ह ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेची कल्पना मांडली आहे. येत्या पाच वर्षांत त्या दिशेने काम होऊन अधिकाधिक गुंतवणूक देशात होईल, असा विश्वास आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम आता सुरू आहे. विद्यापीठांनी हा बदल ओळखून त्यासाठीचे आवश्यक अभ्यासक्रम समाविष्ट केले पाहिजेत,’ असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. 

‘आपल्या देशातील ज्ञान कधी सुविधांमध्ये अडकले नाही. नालंदा व तक्षशीलासारखी विद्यापीठे त्याकाळी आपल्या देशात होती. शल्यचिकित्सा, खगोलशास्त्र अशा विषयांचा अभ्यास त्याकाळी केला गेल्याचे दिसते. विद्यापीठांनी आता डॉक्टरेट मिळवणाऱ्या संशोधन प्रकल्पांचा खरोखरच किती फायदा विद्यार्थ्यांना होतो, हे तपासले पाहिजे, त्यामुळेच आता विद्यापीठांची जबाबदारी वाढली आहे,’ असे फडणवीस यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी प्रास्ताविक करताना विद्यापीठामार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यापीठाने १४ वर्षे पूर्ण करून १५व्या वर्षात पदार्पण केले आहे. विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर विद्यापीठात येणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख त्यांनी केला.

प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. तत्पूर्वी  विद्यापीठाच्या विस्तीर्ण ४८२ एकर परिसरात नवीन प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन इमारतीचा पायाभरणी समारंभ फडणवीस यांच्या हस्ते झाला.   कार्यक्रमाचे आभार कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZROCC
Similar Posts
‘प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकारांना म्हाडाच्या माध्यमातून घरे देणार’ सोलापूर : ‘पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य शासन सकारात्मक असून, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकारांसाठी म्हाडाच्या विशेष योजनेच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून देणार आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बार्शी पोलीस ठाण्याचे उद्घाटन सोलापूर : ‘बार्शी तालुका पोलीस ठाण्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जलद सेवा मिळेल,’ असा विश्वास पालकमंत्री विजय देशमुख यांनी बार्शी येथे व्यक्त केला.
‘वारी नारीशक्तीमुळे महिलांसाठीच्या योजनांच्या प्रसाराला व्यासपीठ’ पुणे : ‘वारी नारीशक्तीची उपक्रमाने महिलांसाठीच्या योजनांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी नवे व्यासपीठ मिळाले आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
‘राज्यात सोलापूर जिल्ह्याची विशेष छाप’ पुणे : ‘राज्यात अनेक जिल्ह्यांपैकी सोलापूर शहर, जिल्हा अनेक वैशिष्ट्यांनी नटलेला आहे. खास करून सोलापूरची खाद्य संस्कृती माझ्यासारख्या माणसाला आवडते. सोलापूरचे वस्त्रोद्योग जगभर प्रसिद्ध आहेत. मी प्रत्यक्ष सोलापूर पाहिले असून, सोलापूरची अनेक वैशिष्ट्ये पाहता यातून सोलापूरची श्रीमंती दिसून येते. म्हणून

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language